ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुल येथे रू.१७३.९१८ कोटी किंमतीच्‍या शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला राज्‍य मंत्री मंडळाची मान्‍यता

माजी मंत्री आ. मुनगंटीवार यांच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांचे फलीत

चांदा ब्लास्ट

२०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीत जनतेला दिलेला शब्‍द केला पूर्ण 

चंद्रपूर जिल्‍हयातील मुल येथे पदविका अभियांत्रीकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यासाठीच्‍या प्रस्‍तावाला राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या आज झालेल्‍या बैठकीत मान्‍यता देण्‍यात आली आहे. माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी २०१९ च्‍या विधानसभा निवडणूकीत मुल येथील जनतेला दिलेला शब्‍द पूर्ण केला असून त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍तापूर्ण तांत्रीक शिक्षणाच्‍या नव्‍या संधी उपलब्‍ध होणार आहेत. मुल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नविन पदविका अभियांत्रीकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली असून नविन शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍याकरिता टप्‍पाटप्‍पयाने ३९ शिक्षकीय व ४२ शिक्षकेतर कर्मचारी पदे मंजूर करण्‍यात आली आहे. मुल येथे नविन शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍याकरिता टप्‍पाटप्‍पायाने होणारा आवर्ती खर्च रू.२२६९.५८ लक्ष व अनावर्ती खर्च रू.१५१२१.५ लक्ष अशा एकूण रू.१७३९१.८ लक्ष इतक्‍या खर्चास मान्‍यता देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाने मंत्रीमंडळासमोर सादर केला. या प्रस्‍तावाला राज्‍य मंत्रीमंडळाने आज झालेल्‍या बैठकीत मान्‍यता दिली आहे.

मुल येथे सुरजागड इस्‍पात प्रा.लि. ही कंपनी लोहनिर्मीती कारखाना उभारणार आहे. तसेच बरीच औद्योगिक संस्‍थाने त्‍यांच्‍या कारखान्‍याची उभारणी करणार आहेत. खनिकर्म, ऑटोमेशन, दुध संचार, बांधकाम, विज निर्मीती, लोह निर्मीती इत्‍यादी क्षेत्रामध्‍ये मोठा औद्योगिक विस्‍तार लक्षात घेता मुल येथील शासकीय तंत्रनिकेतन महत्‍वपूर्ण पाऊल ठरणार आहे. मुल येथे खाणकाम व्‍यवसाय व त्‍या आधारीत उद्योग व्‍यवसाय सुरू होत आहेत यासाठी कुशल मनुष्‍यबळ व स्‍थानिक युवकांना रोजगारासाठी तांत्रीक शिक्षण देण्‍याच्‍या दृष्‍टीने शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासन स्‍तरावर रेटली. यासंदर्भात उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्‍यासह सतत बैठकी घेवून या विषयाचा पाठपुरावा त्‍यांनी केला. फलस्‍वरूप मुल येथे पदविका अभियांत्रीकी शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यास राज्‍य शासनाने मान्‍यता दिली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या शैक्षणिक विकासाच्‍या दृष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार सातत्‍याने प्रयत्‍नशील आहेत. वैद्यकिय शिक्षणाच्‍या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरणारे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर, सैनिकी शिक्षण देणारी चंद्रपूर जिल्‍हयातील अत्‍याधुनिक सैनिकी शाळा, बल्‍लारपूर येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र, स्‍व. सुषमा स्‍वराज महिला सक्षमीकरण केंद्र बल्‍लारपूर, कृषी शिक्षण व प्रशिक्षण देण्‍यासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूरसाठी टाटा समूहातर्फे ९ ट्रेनिंग सेंटरसाठी २६७ कोटी रू. निधी, ग्रंथालय व मुलींचे वसतीगृह यासाठी १२ कोटी रू. निधी, बल्‍लारपूर येथे डिजीटल शाळा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकेंद्र स्‍थापन करण्‍यासाठी प्रयत्‍न, बल्‍लारपूर, पोंभुर्णा, मुल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अधिक सक्षम करण्‍यासाठी प्रयत्‍न आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यासाठी राज्‍य शासनाने दिलेली मान्‍यता आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नांचे फलीत आहेच सोबतच त्‍यांच्‍या शैक्षणिक विकासाच्‍या दृष्‍टीकोणाचे प्रतिबिंब या निर्णयाच्‍या माध्‍यमातुन स्‍पष्‍ट झाले आहे.

राज्‍य शासनाने घेतलेल्‍या या निर्णयाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री व वित्‍तमंत्री अजित पवार, उच्‍च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्‍य सचिव राजेशकुमार मिना, उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव आदींचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये