रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने आयोजित ज्ञानगंगा संवाद परिषद यशस्वी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने लिना किशोर मामीडवार इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, स्टडिज ॲन्ड रिसर्च येथे ज्ञानगंगा या संवाद परिषदेचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमात आठ शाळांमधील इंटरॅक्ट क्लबचे १९० विद्यार्थी सहभाग झाले होते.
या परिषदेचे उदघाटन व्दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ३०३० चे माजी राज्यपाल किशोर केडिया, पीडीजीआशा वेणुगोपाल, अमित लाहोरी, श्रीमती मोखलकर, डॉ.विजय आईंचवार, रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष संदिप रामटेके, सचिव राजेश गण्यारपवार, प्रकल्प संचालक संतोष तेलंग, प्रकल्प संचालिका स्मिता जिवतोडे उपस्थित होते.
या परिषदेमध्ये पीडीजी महेश मोखळकर यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. पीडीजी शब्बीर शाकीय यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती कशी करावी हा विषय समजावून सांगितला. तर पीडीजी विरेंद्र पाथ्रीकर यांनी स्वत:ची प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर पोलीस दलातील एएसआय मुजावर अली यांनी सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ.राजश्री मार्कंडेवार यांनीही विद्यार्थ्यांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात हितगुज करतांना करिअर गायडन्स, बंडू धोतरे यांनी ही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सचिन गांगरेड्डीवार, स्मिता जीवतोडे यांनी केले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, मुख्य संयोजक डॉ.विजय आईंचवार, सह-संयोजक महेश उचके, प्रकल्प संचालक-स्मिता जीवतोडे, संतोष तेलंग, अनुप यादव रोटरी व इनरव्हील सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व सहभागी, वक्ते आणि आयोजकांचे आभार सचिव राजेश गण्यारपवार यांनी मानले.
या परिषदेत चांदा पब्लिक स्कूल, श्री महर्षी विद्या मंदिर, सेंट मायकेल सीबीएसई स्कूल, चंद्रपूर पब्लिक स्कूल, छोटूभाई पटेल हायस्कूल, नारायण विद्यालय, पॅरामाउंट स्कूल , रफी अहमद क्विडवाई स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
					
					
					
					
					


