ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दत्ता मेघे यांचा जन्मदिवस चिमुकल्यांसोबत साजरा…

डॉ. अभ्युदय मेघे यांचे आयोजन ; वर्धा सोशल फोरमचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे तसेच गरिबांनी वंचितांच्या मदतीला सदैव धावून येणारे माजी खासदार दत्ताची मेघे यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवाजी चौधरी संचालित स्नेहालय येथे विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवसाच्या करण्यात आला.

11 नोव्हेंबर विदर्भाचे नेते माजी खासदार दत्ताजी यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून डॉ.अभ्युदय मेघे यांच्या पुढाकारातून स्नेहालय येथे विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना नाश्ता देत हा जन्मदिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने डॉ. मेघे यांनी दत्ताजी मेघे यांच्या दानशूरपणाची अनेक उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसमोर ठेवले. वर्धा जिल्ह्यात मेघे साहेबांमुळे अनेकांना रोजगार तसेच अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत देण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. अनेक रुग्णांना त्यांनी मोफत उपचार देखील त्यांच्या दवाखान्याच्या माध्यमातून केले. आणि या सर्वांचा मला प्रत्यक्ष भाग होण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांनी आभार देखील मानले.

यावेळी शिवाजी चौधरी म्हणाले दरवर्षी गुढीपाडव्याला मेघे साहेब आम्हाला एक लाख रुपयाची आर्थिक मदत न चुकता करतात. त्यामुळे आसमंत स्नेहालय,प्रेम मंदिर यासाठी फार मोठी मदत होते.तसेच त्याच्या रूग्णालयात सर्व विद्यार्थांना मोफत उपचार देखील देण्यात येतो.आणि त्याचा हा जन्मदिवस आमच्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार त्यांनी मानले.

या कार्यक्रमाला मनीषा मेघे, डॉ. जुई मेघे,श्याम परसोडकर,शिवाजी चौधरी,रवींद्र टप्पे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रदीप रोडे, राजू कोरडे, सारंग उमाटे यांचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये