ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी गडचांदूर नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

वंचित बहुजन आघाडी आगामी गडचांदूर नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिव्यकुमार बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आंबेडकरी विचार सरणीच्या संघटना सोबत येत असेल तर त्यांना सुद्धा सोबत घेतले जाईल असे ठरविण्यात आले.

बैठकीत माजी जिल्हा अध्यक्ष प्रा सोमाजी गोंडाने, जिल्हा सल्लागार मधुकर चुनारकर, तालुका अध्यक्ष विजय खाडे, सरचिटणीस राहुल निरंजने, उपाध्यक्ष शरद बोरकर, संघटक विक्की खाडे, शुद्धोधन खैरे, सुनील फुलझेले आदी उपस्थित होते.

सभेचे संचालन व आभार प्रदर्शन धनराज चांदेकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये