ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बालाजी नगर येथून मोटार सायकल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बालाजी नगर येथील रहिवासी डॉ अक्षय विक्रम गुट्टे यांची बजाज कंपनी ची पल्सर मोटार सायकल क्र MH 28 AT 7350 किंमत 40 हजार रुपये त्यांच्या घराजवळून अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना 31 ऑक्टोंबरच्या मध्यरात्री घडली.
मोटार सायकल चोरी ची तक्रार डॉ.गुट्टे यांनी पोलिस ठाण्यात 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन काकड करीत आहे



