दिवाळीअंक प्रदर्शनीचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान. प्रमोद बानबले यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व दिवाळी अंक वाचनीय असुन वाचकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे उद्घाटनप्रसंगी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. सतिशराव शिनखेडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दत्ताजी कात्यायन होते. दिवाळी अंकाचे प्रदर्शन दिनांक ६नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाचनालयाच्या सभागृहात वाचकांसाठी वाचनालयाच्या वेळेत उपलब्ध राहिल. महाराष्ट्रातील विविध प्रकाशकांनी प्रकाशित केलेले दिवाळी अंक प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे कार्यकारी मंडळ व बहुसंख्य वाचकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाच्या कर्मचारी वृदांनी अथक परिश्रम घेतले.



