ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद भद्रावती वर भगवा फडकविण्याचा शिवसेना उबाठा गटाचा निर्धार

नगर परिषद सत्ता कायम ठेवा.. आमदार संजय देरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती शहरातील बालाजी सभागृहात दिनांक २ नोव्हेंबर रोज रविवारला लोकसभा संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात उबाठा गटाची आढावा बैठक पार पडली. भद्रावती नगर परिषदेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा भगवा या स्थानिक स्वराज्य संस्थेवर कायम फडकत आलेला आहे. अलीकडील संघर्षाच्या काळात डगमगून न जाता पूर्वापार रुजलेली शिवसेनेची पाळेमुळे सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी अधिक घट्ट करण्याची वेळ आलेली आहे. असा सूर यानिमित्ताने उपस्थित मार्गदर्शकांनी व्यक्त केला.

शिवसेनेची शकले झालीत हे वास्तव असले तरी मूळ सेना बाळासाहेबांचीच आहे. त्यामुळे उडाले ते “कावळे राहिले ते मावळे” या उक्तीप्रमाणे शिवसैनिकांनी वागले पाहिजे. आणि परत एकदा जोमाने सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण केले पाहिजे. असे कळकळीचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

बैठकीचे अध्यक्ष आमदार तथा शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्र संजय भाऊ देरकर यांच्या प्रमुख उपस्थिती सह शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर ताजने, भावना खोब्रागडे शिवसेना महिला संघटिका चंद्रपूर, गणपत लेडांगे जिल्हा संघटक यवतमाळ, येशू आरगी युवा सेना सरचिटणीस, नूतन लेडांगे उपजिल्हाप्रमुख कामगार सेना, मायाताई नारडें महिला उपजिल्हा संघटिका, बंडू डाकरे विधानसभा प्रमुख, नंदू पढाल शिवसेना तालुकाप्रमुख, सचिन डुकरे तालुका समन्वयक,घनश्याम आस्वले शहर प्रमुख, संतोष कुचनकरतालुका प्रमुख वणी, राजू तुराणकर शहर प्रमुख वणी मायाताई टेकाम महिला शहर संघटिका महिला, बंडूभाऊ चटपल्लीवार शहर संघटक, सुयोग भोयर शहर समन्वयक, सतीश आत्राम तालुका संघटक युवासेना, नितिन सातपुते, ऑड. ठेंगने, स्वप्निल मोहितकर, गौरव नागपुरे, मयूर शेडामे, राहुल खोडे, उत्तम मुजुमदार, विजय पारोदे इत्यादी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका प्रमुख नंदू पढाल यांनी केले.

एकदिलाने संघटित राहून उबाठा ची मशाल सतत तेवत ठेवण्याचा निर्धार यावेळी असंख्य शिवसैनिकांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये