ग्राम स्वच्छतेतून घराघरात पोहचविले कर्मयोगी गाडगे महाराजांचे विचार
मंगेश येरमे यांच्या संकल्पनेतील जेष्ठ जगन्नाथ भक्तांचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील गणपती वॉर्ड गवराळा येथे दिनांक २ नोव्हेंबर रोजी जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त जेष्ठ मित्र मंडळा तर्फे ग्राम स्वच्छता मोहीम राबवून “स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती” उपक्रम पार पडला.
मंगेश येरमे यांच्या संकल्पनेतील या ग्रामोन्नती उपक्रमा करिता गुरुदेव भक्त व तुकोडजी महाराजांच्या विचाराचे प्रचारक विशाल गावंडे यांनी याप्रसंगी विशेष मार्गदर्शन केले. संघटित समाजातून विकसित भारत घडतो, तद्वतच
स्वच्छतेतून उत्तम आरोग्य ,उत्तम आरोग्यातून सुदृढ समाज घडतो त्यामुळे आपला परिसर आपणच स्वच्छ करून स्वच्छतेचा संकल्प नागरिकांनी करावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आदिवासी नेतृत्व मंगेश येरमे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन बावणे यांनी केले. याप्रसंगी सर्व वयोवृद्ध ज्येष्ठ जगन्नाथ भक्त व परिसरातील स्वच्छता दूत आवर्जून उपस्थित होते.



