अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
हेक्टरी २५ हजार मदत देण्याची बाजार समितीचे संचालक निखील सुरमवार यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
सावली तालुक्यात मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे सावली तालुक्यातील शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत. पावसामुळे ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिसकावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्याच्या अनुषंगाने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखील सुरमवार यांनी केली आहे.
सावली तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. धान, कापूस, सोयाबीन यासह कडधान्य पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जाते. सध्यास्थितीत हलक्याच्या प्रतिच्या धानाची कापणी झाली आहे. तर उच्च प्रतिचा धानही पूर्णत्वाच्या मार्गावर असतानच अचानक तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे धानाला कोंब फुटले आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा धान जमिनीवर कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखील सुरमवार यांनी केली आहे.
लागवडीचा खर्चही निघेणा
मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, त्यानंतरचे ढगाळ वातावरण त्यामुळे धानाला विविध रोगाचा प्रादूर्भाव झाला. शेतकऱ्यांनी विविध प्रकारची फवारणी केली. आता पुन्हा धान कापणी योग्य होताना पाऊस कोसळला. यामुये उत्पादनात मोठी घट होणार असून लागवडीचा खर्चही निघेणासा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी निखील सुरमवार यांनी केली आहे.



