जिल्हा परिषद शाळा कोची येथे विद्यार्थ्यांसोबत रक्तदूत जितेंद्र मशारकर यांचा वाढदिवस साजरा
समाजसेवकाचा अनोखा उपक्रम — ७५ वेळा रक्तदान करून अनेकांना जीवनदान

चांदा ब्लास्ट
समाजातील रक्तदान चळवळीचे प्रतीक ठरलेले रक्तदूत जितेंद्र मशारकर यांनी यंदा आपला वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोची (केंद्र ढोरवासा) येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा करून सामाजिकतेचा सुंदर संदेश दिला.
या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान मा. डॉ. प्रकाश महाकाळकर साहेब तसेच मा. दिनकर गेडाम (प्र. केंद्रप्रमुख) होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मा. महेंद्र भाऊ भोयर (सरपंच), शा.व्य.स. अध्यक्ष राकेश भोयर, गजानन बोढे, धानोरकर भाऊ, दशरथ डोंगे, वैभव राजुरकर, मारोती भोयर, मा. गजानन भोयर, संतोष क्षिरसागर, ललीता नवघरे यांसह गावातील मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी अनंता चिंचोलकर व कु. मनिषा चन्नावार मॅडम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदूत मशारकर यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक, लेखन साहित्य आणि चॉकलेटचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवसाचा आनंद वाटला. विद्यार्थ्यांनीही आपल्या “रक्तदूत काकांना” वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
रक्तदान हे समाजासाठी सर्वोत्तम दान असल्याचा संदेश मशारकर यांनी या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी आजपर्यंत ७५ वेळा रक्तदान करून अनेकांना जीवनदान दिले असून, समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
त्यांचा हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला नाही, तर समाजात “वाढदिवस साजरा करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे” हा संदेश देणारा ठरला.



