जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
1 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत शिक्षण घेऊन सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यावसायिक व्यापार उद्योग कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले शाळेतील माजी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश निमकर होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत वडगाव चे उपसरपंच सुदर्शन डवरे सदस्य कैलास मेश्राम सदस्य सुरेंद्र निमकर पुंडलिक उरकुडे डोमाजी धोटे उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून श्री सोमेश्वर शंकर ढवळे उपाध्यक्ष म्हणून दिलीप बबन पहाणपट्टे कोषाध्यक्ष म्हणून राहुल गणपत गाढवे, सदस्य म्हणून सहायक पोलीस निरीक्षक राजू सोनपित्रे,इंजिनिअर धनंजय डाखरे रोहित तुरणकर, अतुल शेंडे,सचिन सोनपित्रे ,निलेश आस्कर,गौरव झाडे,शुभम निखाडे, रामचंद्र काकडे वैभव उरकुडे (आर्मी) दिनेश टाले सल्लागार सदस्य म्हणून पालक प्रतिनिधी कैलास मेश्राम सेवानिवृत्त कर्मचारी श्री श्रीराम भोंगळे गुरुजी, महिला सदस्य वैशाली जीवतोडे कुंती आंबेकर वैष्णवी ठाकरे हर्षाली खारकर यांची निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून नितीन जुलमे तर या संघाचे सचिव म्हणून काकासाहेब नागरे यांची निवड करण्यात आली.सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सदर उपक्रम राबविण्याकरिता गटशिक्षणाधिकारी श्री कल्याण जोगदंड व केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वीते करिता पुष्पा इरपाते मॅडम विनायक मडावी सर अनिल राठोड सर नितीन जुलमे सर यांनी सहकार्य केले.संचालन सचिन सोनपित्रे यांनी तर आभार सुरेंद्र निमकर यांनी मानले.



