जिल्हा बँकेचे संचालक रोहित बोम्मावारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.डॉ.शेखर प्यारमवार
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच सावली येथील साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहित बोम्मावार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज शनिवार दि.१ नोव्हेंबरला राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केल्याने सावली तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे.
सावली पंचायत समिती जवळील पंटागणात शनिवार दि १ नोव्हेंबर रोजी आयोजित भाजपा पक्ष मेळाव्यात महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी रोहित बोम्मावार यांच्या गळ्यात दुप्पटा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोम्मावारांच्या पक्षप्रवेशाने तालुक्यात भाजपाला मोठा
विकासाला गती देणार: रोहित बोम्मावार
साथ फाऊंडेशनच्या माध्यमातून मी नेहमीच युवक, शेतकरी आणि सामाजिक उपक्रमांसाठी काम केले आहे, आता ही ताकद भाजपाच्या तंत्रज्ञान व संघटनात्मक शक्तीशी जोडून तालुक्यातील विकासाला गती देण्याचा माझा प्रयत्न राहील, असा विश्वास रोहित बोम्मावार यांनी यावेळी दिला.
आधार मिळाला आहे. तर कॉग्रेससह विविध राजकीय पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्याने मोठी खिंडार पडली आहे.
शिक्षण व सहकार क्षेत्रातून समाजकार्यात आलेल्या रोहित बोम्मावार यांनी मागील काही वर्षांपूर्वी साथ फाऊंडेशनची स्थापना करुन जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाचा धडाका लावला होता. दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळीसुद्धा निर्माण केली होती.
तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या विरोधात उमेदवारी दाखल करून विजय मिळवला तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग येऊन अखेर आजते भाजपावासी झाले.



