मोटर सायकल चोरीचा गुन्हा पोलीसाच्या सतर्कतेने उघड
वर्धा पोलीसांची उत्कृष्ट कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे कि, फिर्यादी हिरा दिलीपराव पारटकर वय 45 वर्ष रा. प्राजक्ता कॉलनी, नालवाडी, वर्धा यांनी दिनांक 16/09/2025 रोजी पो स्टे वर्धा शहर येथे तकार दिली कि, ते दिनांक 16/09/2025 रोजी 11/00 वा चे सुमारास सामान्य रुग्णालय वर्धा येथे वैदयकिय तपासणी करण्या करीता गेली, व त्यांनी त्यांची डयुटी करूण घरी परत येउन त्यांची पांढ-या रंगाची होंडा अॅक्टीव्हा मोपेड 4G गाडी क्रमांक एम एच 32 ए एल 7815 ही पार्कीग मध्ये उभी केली, व वैदयकिय तपासणी करूण फिर्यादी हया अंदाजे 12/30 वा चे सुमारास गाडी जवळ परत आली असता त्यांना त्यांची मोपेड अॅक्टीव्हा गाडी दिसुन आली नाही, त्यांची पांढ-या रंगाची होंडा अॅक्टीव्हा मोपेड 4G गाडी कमांक एम एच 32 ए एल 7815 किमत 30,000/- रू ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक 16/09/2025 रोजी 11/00 ते 12/30 वा दररम्यान चोरूण नेली आहे, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरूण पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 1399/2025 कलम 303(2) बिएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर हे चोरी गेलेल्या मोपेड होंडा अॅक्टीव्हा गाडीचा शोध घेत असता त्यांना माहीती मिळाली कि, इतवारा बाजार वर्धा येथे राहणारा साहील उर्फ गोलु पुरोहीत याने सदर होंडा अॅक्टीव्हा मोपेड गाडी कमांक एम एच 32 ए एल 7815 ही चोरी केली असुन ती इब्राहीम यांचे जुने राफकेलचे गोडाउनचे आवारात लपवुन ठेवली आहे, अशा माहीती मिळाल्याने पोहवा शैलेश चाफलेकर व त्यांचे टिमने शिताफीने इतवारा बाजार येथे राहणारा साहील उर्फ गोलु पुरोहीत याचे घरी गेलो असता तो घरीच हजर मिळुण आला, त्याला आमचा परीचय देउन मोपेड गाडी बाबत विचारणा केली असता त्याने ती गाडी दाखवुन चोरी केली असल्याची कबुली दिली. वरूण गुन्हयात चोरी गेलेली मोपेड अॅक्टीव्हा गाडी व गुन्हयातील आरोपी साहील उर्फ गोलु पुरोहीत यास ताब्यात घेउन त्यांचे ताब्यातुन एक पांढ-या रंगाची मोपेड अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम एच 32 ए एल 7815 किमत 30,000/- रू ची हस्तगत केली. सदर अॅक्टीव्हा मोपेड गाडी त्याने एकटयानेच चोरली असल्याचे सांगीतले, सदर गुन्हा घडताच उघडकिस आणला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री वाघमारे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक वर्धा संतोष ताले, पो. उपनि शरद गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, पवन लव्हाळे, पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे, शिवदास डोईफोडे सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.



