वरोडा येथे अवैध विटा भट्टीचा धंदा जोमात.,महसूल विभाग कोमात
शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या वरोडा शांतीनगर येथे शेत सर्व्हे नंबर 110 आदिवासी कोलाम शेतकऱ्यांच्या शेतात अवैध वीटाभट्टीचा धंदा जोमात सुरू असतांना महसूल विभाग कोमात आहे विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना सुरू असलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही.
अवैध रित्या आदिवासी कोलाम शेतकऱ्यांच्या शेतीच्या व्यवसायाकरिता शेतीची जागा अकृषक करणे आवश्यक असून तालुका दंडाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यातच लाल विटा निर्मिती करिता शासनाकडून बंदी आहे, मात्र असे असले तरी तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात लाल विटांची विना परवाना निर्मिती केली जात आहे.यामुळें त्या जागेवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही शांतीनगर येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वीट भट्टीतून निघणाऱ्या दगडी कोळशाच्या प्रदूषणामुळे कर्करोग दमा अस्थमा लहान मुलांचे आजार आदींचा धोका वाढला आहे.शांतीनगर वरोडा येथील नागरिकांचे आरोग्य तपासणी करावी तसेच अवैध वीटभट्या तात्काळ बंद करण्यात याव्या अन्यथा या परिसरातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
वरोडा येथे अनेक वर्षापासून आदिवासी कोलाम शेतकऱ्यांच्या शेतात अवैध विटा भट्टीचा व्यवसाय सुरू आहे शासन परवानगी नाही 10 फूट खोल मोठमोठे खड्डे पडले असल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्यांच्या लाखोंच्या जमिनी कवडीमोल भावाने हडपून त्या जमिनीला बंजर बनविले आहे लाखोंचा महसूल बुडत आहे अनेकदा तहसीलदारांना सांगूनही कारवाई होत नाही जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
उमेश राजूरकर,माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, कोरपना
याबाबत सर्व वीटभट्टी मालकांना विटा व माती साठवणूक प्रकरणी नोटीस पाठविली व 24 तासांत खुलासा सादर करण्यास सांगितले असून समोरील कागदपत्रे तपासून वीटभट्टी मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल
ओमप्रकाश गोंड, तहसीलदार राजुरा