ब्रम्हपूरीतील अनेकांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश
काॅंग्रेस विधीमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट
सध्या देशभरासह राज्यात देखील महागाईने कळस गाठला असुन सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सोबतच युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आता काॅंग्रेस पक्षाकडे वाढलेला दिसून येत आहे.
विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात सुरु असलेला ब्रम्हपूरी शहरातील विकास बघता मोठ्या प्रमाणात ब्रम्हपूरी शहरातील नागरिक सुखावले असुन काॅंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहेत. ब्रम्हपूरीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभागांच्या सर्व सोयीसुविधा युक्त नवीन इमारती उभ्या झाल्या आहेत. तर अनेक विकासकामे निर्माणाधीन व पुर्णत्वास आली आहेत. या सर्व विकास कामांमुळे प्रभावित होऊन व विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ब्रम्हपूरी शहरातील अनेक नागरिकांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी येथील कमलाई निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला आहे.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये ब्रम्हपूरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल दोनाडकर, माजी नगरसेवक सचिन राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय बल्लारपुरे, कंत्राटदार मनोहर सहारे, वसंता ज्ञानवाडकर, मुर्लीधर शिवरकर, राकेश उरकुडे, प्रशांत करपे, प्रफुल नाकतोडे, प्रणय सोंदरकर, प्रशांत तोडकर, सचिन निशाने, पराग भोयर, प्रभाकर सोंदरकर, अमित सहारे, नयन सेलोटे, कार्तिक उरकुडे, प्रवीण पारधी, कुणाल कामडे, नितेश मेश्राम यांसह अन्य जणांचा यामध्ये समावेश आहे.
पक्षप्रवेश प्रसंगी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी नगरसेवक डॉ.नितीन ऊराडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.



