हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे कुंटणखान्यावर धाड
एका महिलेची सुटका, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदा ब्लास्ट
पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने लोहार येथील हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे चालविण्यात येत असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकत एका महिलेची सुटका केली. तसेच आरोपीला अटक केली.
31 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. यावेळी त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लकी नावाचा मुलगा हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता पिडीत महिलांना हॉटेलमध्ये बोलावून कुंटणखाना चालवित आहे. या गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे छापा टाकला असता, आरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय 26), रा. अलवर, राजस्थान हा हॉटेलमध्ये एका पिडीत महिलेकडून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन झाले. यावरून रामनगर पोलिस स्टेशन येथे कलम 3,4,5,7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच कामगिरी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, चंद्रपूर, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकर, सहायक फौजदार धनराज कारकाडे, पोलिस हवालदार सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार , किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, महिला पोलिस छाया निकोडे,अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तितरे तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सरिता मालू, रेखा भारसकडे यांनी केली आहे. याद्वारे सर्व लॉजिंग, हॉटेल व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले आहे की, कुंटणखाणे चालवू नयेत, अन्याय कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.



