ब्रह्मपुरी तालुक्यात २९,३० ऑक्टोबर रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
दि. २९,३० ऑक्टोबर रोजी अवकाळी पावसाने ब्रह्मपुरी तालुक्याला चांगलेच झोडपले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकांचे मोठे नुकसान झाले. हातात आलेले शेतकऱ्यांचे पिक पावसामुळे ऊधवस्त झाले. या सर्व नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री तनय देशकर यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे ब्रह्मपुरीच्या दौऱ्यावर आले असता केली. यावेळी शासकीय कार्यक्रमाला संबोधित करताना आपल्या भाषणात महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
या निर्देशामुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. २९,३० ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना या मागणीमुळे दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पंचनामे करून घेण्याबाबत सजक राहण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तनय देशकर यांनी केले आहे.



