ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर खराब रस्त्यांच्या कामाला सुरुवात : शिवसेना उबाठाच्या मागणीला यश

मिठाईचे वाटप करून आनंद साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती तालुक्यातील खराब रस्त्यांच्या संदर्भात शिवसेनेच्या उबटा तर्फे काढलेल्या मोर्चाला यश मिळाले असून, संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना अखेर सुरुवात झाली आहे.

या यशामुळे व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या वतीने मिठाईचे वाटप करून हा आनंद साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला नितीन सातपुते, अनिरुद्ध डभारे, अशोक निगम, सुनील पडोळे, रोहन कटारे आणि बालू नीथ यांची उपस्थिती लाभली.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडचणींवर सातत्याने आवाज उठवल्यामुळे प्रशासनाला अखेर कामाला लागावे लागले.

जनतेच्या हक्कासाठी शिवसेना उबठा सदैव तत्पर राहील असे बोलन्यात आले नसुन यावेळी नितिन सातपुते, सुयोग भोयर, अशोक निगम सह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये