एकतेचा संदेश देत भद्रावती पोलिसांचे “वॉक फॉर युनिटी”
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
खाकी वर्दीचा सामाजिक संवेदनशीलतेचा आला प्रत्यय
दि. ३१ ऑक्टोबर रोजी अंखडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती चे औचित्य साधत चंद्रपूर पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “वॉक फॉर युनिटी” उपक्रम भद्रावती पोलिस स्टेशन तर्फे राबविण्यात आला.
या वेळी लोकमान्य टिळक विद्यालय ते पोलिस स्टेशन भद्रावती पर्यंत एकता रॅली काढण्यात आली.
ठाणेदार योगेश पारधी यांचे प्रमुख मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशन चे कामकाज, मोहरर कामकाज पद्धती, गुन्हे अन्वेषण शाखा, स्टेशन डायरी, बिनतारी संदेश, तसेच पोलीस हत्यारां विषयी माहिती देण्यात आली.
या उपक्रमातून पोलिस विभागाची समाजाविषयी संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवली .याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्ष लागवडी चे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमा करिता भद्रावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संघटना पदाधिकारी, लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक, तहसील व वन विभागा चे अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व पोलिस निरीक्षक योगेश्वर वी. पारधी यांचे पुढाकारातून आयोजित उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारे, संजय मिश्रा, धोंगडेभद्रावती, मुळे, गेडाम मॅडम, तसेच पोलीस अंमलदार व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.



