ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडपेठ येथे सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन

पावर ग्रिड कार्पोरेशनचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           पावर ग्रीड कार्पोरेशन भद्रावती द्वारा घोडपेठ ग्रामपंचायत कार्यालयात सतर्कता जागरूकता सप्ताह अंतर्गत एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचार प्रति जागरूक राहून प्रामाणिकपणा व पारदर्शकतेला महत्त्व देणे हा या ग्रामसभेचा प्रमुख उद्देश होता. या ग्रामसभेला सरपंच, पावर ग्रीड कार्पोरेशनचा अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य तथा इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पावर ग्रीडच्या पथकाने भ्रष्टाचार मुक्त भारत विकसित- भारत या विषयावर प्रकाश टाकत भ्रष्टाचार हा समाजाच्या विकासामध्ये बाधक ठरत असल्याने भ्रष्टाचार नाहीसा करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी भ्रष्टाचार विरोधात शपथ घेण्यात आली. सदर ग्रामसभेला गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये