बेंड द बार जिमचा आकाश दडमल ठरला ‘भद्रावती रोटरी श्री 2025’
रोटरी दिवाळी मेळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील रोटरी क्लबतर्फे सुरू असलेल्या दिवाळी मेळाव्यात विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी रोटरी क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांतून स्पर्धकांनी सहभाग घेतला.
भद्रावती येथील बेंड द बार फिटनेस जिमच्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी बजावली. 70 किलो गटात सुरज मेश्राम याने चौथा क्रमांक मिळविला, तर 75 किलो वजन गटात आकाश दडमल याने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकविला. त्याचबरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा ‘भद्रावती रोटरी श्री 2025’ किताबही आकाश दडमलच्या नावावर झाला.
या यशाबद्दल सर्वत्र आकाश दडमलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बेंड द बार जिमचे संचालक अरविंद वाघमारे व अनुप वाघमारे यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच गुणवंत क्रीडा पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र स्ट्रॉंग मॅन पुरस्कार प्राप्त अमोल आवळे यांनीही आकाशला शुभेच्छा दिल्या. जिममधील सर्व सदस्यांनीही त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



