ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘वॉक फॉर युनिटी’चे यशस्वी आयोजन

पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 भारतीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर वर्धा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ‘वॉक फॉर युनिटी’ (Walk for Unity) चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.उल्लेखनीय सहभाग आणि गटवारी:या ‘वॉक फॉर युनिटी’ करिता जवळपास ३००० हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) केली होती. सहभागी नागरिकांचे वय आणि उत्साहानुसार चार गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते:१२ ते १८ वर्षे१८ ते ३५ वर्षे

३५ ते ५० वर्षे५० वर्षांवरील नागरिककार्यक्रमाची रूपरेषा:

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन झाली उत्साहाने भरलेल्या संगीतमय वातावरणात सकाळी ६.०० वाजता झुम्बा डान्स ने झाली. त्यानंतर, एकामागून एक प्रत्येक गटातील नागरिकांना ‘वॉक फॉर युनिटी’साठी रवाना करण्यात आले.पुरस्कार व गौरव:वॉक फॉर युनिटी’मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रत्येक गटातील प्रत्येकी ७ पुरुष आणि ५ महिला अशा एकूण १२ जणांना पोलीस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आयोजन स्थळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ‘वॉक’मध्ये भाग घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण मार्गावर आणि आयोजन स्थळी योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, ज्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.ज्या नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले नव्हते, त्यांच्या सोयीसाठी स्पॉट रजिस्ट्रेशनकरिता ४ विशेष काउंटरची व्यवस्था करण्यात आली होती.

सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन वर्धा, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर, वर्धा पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) श्री. पुंडलिक भटकर वर्धा जिल्हा श्री विनोद चौधरी पोलिस निरीक्षक स्थ.गु.शाखा तसेच पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस निरीक्षक संतोष ताले पोलिस निरीक्षक सोनटक्के रिझर्व्ह पोलिस निरीक्षक शेख पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक टोपले उपनिरीक्षक राठोड पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड पोलिस उपनिरीक्षक डोनेकर पोलिस उपनिरीक्षक गोमलाटू पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई पोलिस उपनिरीक्षक गिताजंली गारगोटे पोलिस उपनिरीक्षक बानोत पोलिस उपनिरीक्षक गायकवाड पोलिस उपनिरीक्षक लालीपालीवाले पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी आ.एस.आय.खंडारे पोलिस उपनिरीक्षक अलीम शेख पोलिस उपनिरीक्षक खोब्रागडे पोलिस उपनिरीक्षक दोंड पोलिस उपनिरीक्षक येनुरकर अंमलदार 12 8 वाहन उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता वर्धा सायबर सेलचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेले आहेत या कार्यक्रमात वर्धा पोलिस विभागातील. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम अत्यंत कमी कालावधीत यशस्वी पार पडलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये