डॉ. रामप्रसाद शेळके व डॉ. मीनल शेळके शिक्षण ‘रत्न’ गौरव पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात नवे पर्व उभे करणारे, ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक डॉ. रामप्रसादजी शेळके व शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनल शेळके यांना “शिक्षण रत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले,त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.
डॉ. रामप्रसादजी आणि डॉ. मीनल शेळके हे व्यवसायाने डॉक्टर असूनही, समाजातील शिक्षणाची खरी गरज ओळखून त्यांनी डॉक्टरी व्यवसाय बाजूला ठेवत शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक, दर्जेदार व मूल्याधारित शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी सी बी एस सी पद्धतीची ‘राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल’ स्थापन केली.प्रारंभी अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करत त्यांनी चिकाटी आणि परिश्रमाने शाळेला उंची गाठून दिली. आज ही शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून, ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्यासाठी एक दिशा देणारे आदर्श मॉडेल बनली आहे.
शाळेत विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, कला आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्तम संधी मिळत आहेत. शाळेच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणात नवा अध्याय लिहिला गेला आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित मूल्यशिक्षण हे या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे.गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शाळेने अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत ग्रामीण भागातील शिक्षणाची पायाभरणी मजबूत करण्याचे कार्य डॉ. शेळके दांपत्य करीत आहे.शिक्षण रत्न पुरस्कार” हा शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिलेल्या व्यक्तींना दिला जाणारा एक प्रतिष्ठित सन्मान आहे. डॉ. रामप्रसादजी आणि डॉ. मीनल शेळके यांना हा पुरस्कार मिळाल्याने राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल परिवारात आनंदाचे वातावरण आहे. शिक्षक व कर्मचारी वर्गात अभिमान आणि प्रेरणेची भावना संचारली आहे.शाळेचे कार्यकारी अधिकारी सुजित गुप्ता, मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख, उपमुख्याध्यापक फैजल अस्मानी यांनी या दांपत्याचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
 
					 
					 
					 
					 
					


