केशनी हटवार यांना पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माई पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार २०२५

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
साने गुरुजी सोसायटी भद्रावती येथील रहिवासी सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांना स्त्रि कर्तृत्वा साठी पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ माई यांच्या नावे दिला जाणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाज रत्न” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गौरव कर्तुत्वाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न” पुरस्कार वितरण सोहळा हा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले सभागृह, गणेश पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.
भद्रावती येथील सौ केशनी ज्ञानेश हटवार यांच्या सामाजिक, साहित्यिक व आकाशवाणी वरून प्रसारित झालेला कार्यक्रमाची दखल घेऊन, ए. डी. फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ माई महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांचे आकाशवाणी वरती भरपूर कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. विज्ञान जगत, स्त्री सक्षमीकरण, स्त्री आरोग्य, स्त्री संघटना, पर्यावरण विषयक जाणीव जागृती, साहित्यिक कार्यक्रम, हॅलो सखी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित झाले. त्या सोबतच सामाजिक , साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक कवी संमेलनात त्या सहभागी होतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ए.डी. फाउंडेशन च्या वतीने देता जाणारा पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ माई महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने कार्य करण्याची नवी उर्मी मिळते, या विचार सूत्रावर आयोजित केलेल्या ए. डी. फाउंडेशनच्या पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ माई महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांनी जाहीर केले.
सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांना पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ माई महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
					 
					 
					 
					 
					


