एकतेचा संदेश देत देवळीत वॉक फॉर युनिटीचे आयोजन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देवळी पोलिस विभागाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून आज पोलीस स्टेशन देवळी द्वारे भारताची एकता आणि अखंडता एक देश, एक भारत, श्रेष्ठ भारत हा संदेश देण्यासाठी देवळी पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने देवळी शहरात वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मध्ये देवळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या सुमारे सातशे विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोलिस स्टेशनपासून सुरू झालेली ही एकात्मता यात्रा देवळी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत आठवडी बाजार येथे संपन्न झाली.
कार्यक्रमचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यावेळी म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे देशात एकता, अखंडता आणि देशभक्तीची भावना दृढ होते. भारत विविधतेत एकतेचा देश असून, युवकांनी आणि नागरिकांनी अशा उपक्रमांद्वारे राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन देश एकसंघ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस होते तर प्रमुख अतिथी म्हणून एस.एम.डब्ल्यू. इस्पातचे मॅनेजिंग डायरेक्टर दिपक सुमंत, देवळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल मंडाळकर, सृजन स्कूलच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा चौरे, प्राचार्य डॉ.सुनीता सोनारे, माजी न. प.उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, माजी नगराध्यक्ष जब्बार तवर, डॉ. श्रावण साखरकर आणि सुरेंद्र उमाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मध्ये देवळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, देवळी शहरातील पोलीस दल, होमगार्ड, एन.सी.सी. छत्रसैनिक, मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी सदस्य, श्रुजन स्कूल, गुरुकुल स्कूल, खेळाडू, बजरंग दल व सर्व महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांचे सुमारे सातशे विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोलिस स्टेशनपासून सुरू झालेली ही एकात्मता यात्रा देवळी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत आठवडी बाजार येथे संपन्न झाली या प्रसंगी.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ठाणेदार अमोल मंडाळकर, यांनी केले. संचालन प्रफुल्ल कारमोरे पोलीस पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार अमलदार मनोज नप्ते यांनी मानले
वॉक फॉर युनिटी मध्ये प्रथम क्रमांक श्री भांबेवार, द्वितीय विशवेश्वर लांबट, तृतीय रत्नाकर कोंबे यांनी तर प्रोत्साहनपर पारितोषिक सुमित तायवाडे, संकेत मडावी,रेविका सावरकर यांनी पटकाविले त्यांना मान्यवारांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन अमोल मंडाळकर ठाणेदार देवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, प्रकाश निमजे,पोलीस अमलदार मनोज नप्ते,नितीन तोडसे,सागर पवार,श्याम गावनेर,राजू तिवसकर,मनीष कांबळे, प्रियांका तायवाडे,दुर्गेश बनते,गजानन महाकाळकर यांनी केले होते.
या उपक्रमातून देवळी पोलिसांनी राष्ट्रीय एकता, बंधुता आणि देशप्रेमाचा संदेश दिला.
 
					 
					 
					 
					 
					


