भद्रावतीत एकदिवसीय ४५ वर्षांवरील पुरुषांची हॉलीबॉल चषक स्पर्धा
लगान हॉलीबॉल ग्रुप तालुका क्रीडा संकुलचे आयोजन : जिल्ह्यातील नामवंत सहा संघांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्वर्गीय शोभाताई नामदेवराव मत्ते तथा स्वर्गीय अनिल टोंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक दिवसीय ४५ वर्षावरील पुरुषांचे हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन लगान हॉलीबॉल ग्रुप तालुका क्रीडा संकुल तर्फे स्थानिक गौतम नगरच्या पटांगावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले
या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी अध्यक्षस्थानी मेश्राम महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून राजेश मत्ते आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर, गडचांदूर, चिमूर व भद्रावती अशा सहा संघाने सहभाग नोंदविला .या स्पर्धेत बल्लारपूर हॉलीबॉल स्पोर्ट यांनी विजेतेपद तर भद्रावती येथील लगान हॉलीबॉल स्पोर्ट ने उपविजेते पदपटकाविले
विजेत्या व उपविजेत्या या दोन्ही संघांना पारितोषिक व चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
 
					 
					 
					 
					 
					


