ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसाचा सावली तालुक्यातील शेतपिकांना फटका

धान, कापूस पिके उध्वस्त होण्याच्या मार्गांवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली :- पावसाचा हंगाम संपल्यानंतरही सर्वदूर पावसाचा कहर सुरु आहे. सावली तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने येथील धान आणि कापूस पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. बुधवार (ता. २९) रात्रीपासून सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले, ज्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असून हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे शेतकरी फार आर्थिक अडचणीत सापडला आहे तर हवामान विभागाने पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सावली तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक भिजल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या पावसामुळे धान, कापूस पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. एकाच दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात असल्याची अवस्था निर्माण झाली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

अवकाळी पावसाने सावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. धान पीक पूर्णतः पडले आहे, कापून ठेवलेले सरडे पाण्यात भिजत आहेत तर काढणीला आलेला कापूस काळा पडत असल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शासनाकडे केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये