ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र क्षेत्रातील नाल्यातून अवैधपणे रेतीचे उत्खनन करून रेती तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई भद्रावती वनविभागा द्वारे दिनांक 26 ला सकाळी सात वाजता मासळ नियत क्षेत्रातील एका नाल्यात करण्यात आली. एम एच 33 f 20 38 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर द्वारे वनपरिक्षेत्रातील नाल्यातून अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर ट्रॅक्टर मालकाकडे कागदपत्राची मागणी केली. मात्र कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे सदर ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली.

सदर ट्रॅक्टर रुपेश उरकुडे राहणार भद्रावती यांच्या मालकीची आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही आर ठाकरे, कु. एस आर कुळमेथे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये