
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील परचाके यांचे घरी दोन किरायदारचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री तोडले. मात्र, आतमध्ये चोरी न करता चोरट्यांनी जागा सोडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरपना येथील प्रभाग क्रमांक दहा येथे परचाके यांच्या घरी वास्तव्यास असलेले, राठोड व झुरडे हे दोन किरायदार दिवाळीच्या सुट्ट्या निमित्त स्वगावी गेल्याची संधी साधूनत्यांचे घराचे कुलूप रात्री अज्ञातांनी फोडले. सकाळी घरमालक परचाके यांनी बघितले असता कुलूप तुटलेले दिसले. त्याने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
सुदैवाने दोन्ही किरायदाराच्या घरातून कोणतीही चोरी झाली नसल्याने मोठे नुकसान टळले. मात्र, अज्ञात व्यक्तींनी कुलूप का तोडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास ठाणेदार गाडे उपनिरीक्षक राठोड.जाधव.अमर राठोड करत आहे तेव्हा पोलीसाची पेट्रोलियम वाढवा प्रत्येक वार्डात अशी नागरिकांची मागणी करीत आहेत.



