ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी राम कुंभारीकर यांचे दुःखद निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील शनिवार पेठेतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील सेवानिवृत्त अधिकारी रामभाऊ कुंभारीकर यांचे वयाच्या 71 व्या वर्षी दिनांक 26/10/ 25 रोजी सकाळी बेंगलोर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
बँकेत सेवा बजावताना त्यांनी फार मोठा मित्रपरिवार जमा केलेला होता त्यांच्या मृदू भाषेने शाखेत येणारा प्रत्येक ग्राहक हा प्रभावित होऊन जात असे त्यांच्या पार्थिवावर दिनांक 27 ऑक्टोबर 25 रोजी वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे मृत्यु पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, दोन सूना , नातवंडे,एक भाऊ, एक बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.



