ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर येथे धार्मिक नेतृत्वांचे अभुतपुर्व एकत्रिकरण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- प्राचीन काळापासून भारतात दिपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या पर्वात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी मंडळी विविध माध्यमातून संगठीत होत असतात.

अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम या संस्थेकडून गडचांदुर येथे धार्मिक नेतृत्वांचे एकत्रिकरण कार्यक्रम घेण्यात आला.नगरातील धार्मिक मंडळिंचा परिचय या कार्यक्रमांचे स्वरूप होते.

यावेळी विविध मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.

विठ्ठल भगवंताला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश ताजणे,प्रमुख अतिथी म्हणून अनुलोम उपविभाग प्रमुख सुनिल दालवनकर,हभप दिपक पुरी महाराज,साई संस्थान अध्यक्ष संदिप शेरकी, हनुमान मंदिर प्रमुख रामसेवक मोरे, भाग जनसेवक राजुरा सतिश मुसळे यांची उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश मुसळे यांनी केले.

हभप दिपक पुरी महाराज यांनी आपल्या संबोधनात हिंदु धर्मातील विविध सकारात्मक बिंदुवर प्रकाश टाकला.

अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा उत्सव असुन असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक हा दिपावली सन आहे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश ताजणे यांनी केले.यावेळी संदिप शेरकी यांचेही संबोधन झाले.

कार्यक्रमाला हिम्मत सिंह ढोके महाराज,कमलेश डांगे,भारत ताजणे, सुभाष पिंपळशेंडे, विठ्ठल पुरी,विक्रम सिंह कुशवाह,वृषभ मोहरे, श्रीकांत गुंडावार,बंडु पिदुरकर,केशव कुळे,सुरेश सिडाम,अंकुश अंड्रसकर,बाबा खापणे, भास्कर दुरूटकर,विजय आडते,वसंता कुचणकर, निळकंठ टोंगे,राकेश आसुटकर यांचे सह नगरातील धार्मिक नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरात महाकाली महोत्सवाचे आयोजन तथा आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या पदयात्रा संदर्भात निलेश ताजणे व हभप पुरी महाराज यांचा अनुलोम संस्थेच्या माध्यमातून विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद मोहुर्ले यांनी केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये