ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवाडा येथे सुरमयी श्रीगुरुदेव भजन पहाट कार्यक्रम संपन्न 

सुरमयी श्रीगुरुदेव भजन पहाट कार्यक्रमाचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 राष्ट्रसंत विचार साहित्य केंद्रीय समितीच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने करण्यात आले होते. देवाडा महाकाली नगरी स्थित माणिक कुटी भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. ज्येष्ठ समाजसेविका एड. पारोमिता गोस्वामी, एड. डॉ . कल्याण कुमार,भजन प्रेमी श्री .राकेश बोबडे, सौ. रजनी बोढेकर आदींची उपस्थिती होती.

 वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे व श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमास ब्रम्हमुहूर्तावर सुरूवात झाली. सामुदायिक ध्यानपाठानंतर राजमाता राणी हिराई महिला भजन मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत विरचित भजन सादरीकरण करण्यात आले. सुरमयी संगीताने माणिक कुटी परिसर मोहरून गेला होता. बंडू टेकाम यांच्या ‘श्री गुरुदेव दया कर दे ‘ या गीतांच्या गायनाने सुरूवात झाली तर कु. तनिष्का टेकाम यांनी ‘केशवा माधवा ‘ तसेच सौ. कविता टेकाम यांनी ‘चलाना दर्शन घेण्या’ हे गीत सादर करून आध्यात्मिक वातावरण निर्मिती केली. श्रीमती गीता अत्रे यांनी ‘प्रेम हरिचे’,सौ. शारदा निकुरे यांनी ‘श्रीगणा मोरया’, रघुनाथ निमकर यांनी ‘बैठे है तेरा ‘ ह्या भक्तीपर रचना प्रस्तुत केल्या. वासुदेव चवरे, सौ. मंगला झिल्पे,संजय बोढाले, राकेश बोबडे, कार्तिक चरडे यांनी सादर केलेल्या संत रचना श्रीगुरुदेव पहाट प्रसन्न करून गेली.

   भजन पहाट निमित्ताने राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सेवाभावी महिला भजन मंडळ पुरस्कार अतिथींच्या हस्ते राजमाता राणी हिराई महिला भजन मंडळ स्वावलंबीनगर यांना देण्यात आला तर धनोजे कुणबी समाज मंडळाचा उत्कृष्ट आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त हरिश्चंद्र बोढे (भारोसा) यांना गौरविण्यात आले.३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. धनराज खानोरकर (ब्रम्हपुरी) यांचा सत्कार करण्यात आला.

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर दिवाळी पहाटच्या निमित्ताने प्रभावीपणे करण्यात आला, हा अभिनंदनीय उपक्रम असल्याचे मत एड. गोस्वामी यांनी व्यक्त करून आयोजन समितीला धन्यवाद दिले.

    प्रास्ताविक प्रा.नामदेव मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यानी केले. सामुदायिक राष्ट्रवंदना गायनाने समारोप करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये