ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मधुकर मस्कले यांचा आदर्श पुरस्काराने सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल गुणवंत विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेज टेकामांडवा व संगम विद्यालय वणी बु. चे सचिव मधुकर मस्कले यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान इहोवा ईरे फाउंडेशन तर्फे आयोजित महात्मा गांधी जयंती निमित्त दि. २ ऑक्टोबरला भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम वनामती, वसंतराव नाईक सभागृह, धरमपेठ, नागपूर येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री एलिना तुतेजा, सिमरन आहुजा यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या सोहळ्यात एकूण ७५ व्यक्तींना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यामध्ये मधुकर मस्कले यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत आहे. प्रसिद्ध गायक डॉ. सुनील चव्हाण यांनी त्यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमात रंग भरले. या भव्य सोहळ्याचे आयोजन डॉ. रमेश बोरकुटे यांनी केले, तर संचालन अश्विनी पुरी यांनी केले आणि आभार प्रदर्शन एलिना बोरकुटे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये