जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणाऱ्या ट्रक मधुन गोवंश जातीचे एकुण १४ जनावरांची सुखरुप सुटका
एकुण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक १९/१०/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप-विभाग हिंगणघाट परीसरात अवैद्य व्यवसायवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन गोपनिय माहीती प्राप्त झाली की, नॅशनल हायवे क्रमांक ४४ ने जाम कडुन हिंगणघाट रोडने ट्रक मध्ये अवैद्यरीत्या गोवंश जनावरांना कोंबुन त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था नकरता क्रतेने व निर्दयतेने भरुन कत्तली करीता वाहतुक करीत आहे.
अशा माहीती वरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पथक यांनी हिंगणघाट परीसरातील सरकारी दवाखाना चौक परीसरात नाकेबंदी करीत असतांना त्यांना एक संशयीत ट्रक येतांना दिसला तो माहीती प्रमाणे असल्याचे संशयावरुन त्यास सरकारी दवाखाना चौक, हिंगणघाट परीसरात थांबवुन पाहणी केली असता सदर ट्रक मध्ये कत्तली करीता निर्दयतेने कोंबुन गोवंश जातीची एकुण १४ जनावरे ज्यांना दाटीवाटीने भरुन कुरतेने व निर्दयतेने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर ट्रकचे चालक अनुक्रमे नामे १) मोहतशीम आलम मुक्तार अंन्सारी, वय ४१ वर्षे, रा. कामठी, जिल्हा नागपुर, २) इम्रान खॉन मुस्ताक खॉन, वय ३८ वर्षे, रा. कामठी, जिल्हा नागपुर, असे सांगुन त्यांचे वाहन मालक आरोपी कमांक ३) फिरोज कुरेशी, रा. कामठी, जिल्हा नागपुर यांचे सांगणे प्रमाणे सदर गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक करीत असल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताव्यातुन १) गोवंश जातीचे एकुण १४ लहान मोठी जनावरे प्रती नग २०,०००/-रु प्रमाणे २,८०,०००/-रु. २) एक अशोक लेलॅन्ड आयसर कंम्पनीचा मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ४० सिटी ०४३४ किंमत १८,००,०००/- रु. ३) दोन अॅन्ड्राईड मोवाईल किंमत २०,०००/-रु असा एकुण जु. किंमत २१,००,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करुन वरील सर्व तिन्ही आरोपीतांन विरुध्द पोलीस स्टशेन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयातील जप्त करण्यात आलेले संपुर्ण १४ गोवंश जनावरांची सुखरुप सुटका करुन त्यांचे सुरक्षेच्या दृष्टीने व चारा पाण्याची व्यवस्था करीता गोरंक्षण संस्थे मध्ये ठेण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्षा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोउपनि श्री. बालाजी लालपालवाले, पोलीस अमलदार हमीद शेख, अमर लाखे, चंद्रकांत बुरंगे, अमरदिप पाटील, सचिन इंगोले, भुषण निघोट, धर्मेंद्र अकाली, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सागर भोसले, दिपक साठे, मिथुन जिचकार, राहुल अधवाल, रितेश गेटमे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा यांनी केली.