ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते संजय मेंढी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी अग्रभागी राहणारे समाजसेवक संजय भास्करराव मेंढी यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. चंद्रपूर येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आणि जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला.

संजय मेंढी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यात सक्रिय असून गडचांदूर शहरासह परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडणे आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे स्थानिक काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रसंगी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव बावणे, गडचांदूरचे माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर, सुनील झाडे, महादेव हेपट, आकाश वऱ्हाटे, निखिल एकरे तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय मेंढी यांच्या पक्षप्रवेशामुळे गडचांदूर आणि आसपासच्या भागातील काँग्रेस संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये