पारडी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश
लोकाभिमुख कार्य हाच भाजपा सरकारचा अजेंडा - आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : देशाच्या व राज्याच्या विकासासाठी भाजपा एकमेव मोठा पक्ष असून शासनाच्या योजना समाजातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहचवून त्यांना न्याय देण्याचे लोकाभिमुख कार्य देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु असून देशाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पक्षातून कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील पारडी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे बोलत होते. या कार्यकर्त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात नव्या उमेदीने पक्ष संघटन वाढेल आणि विकास कामांना चालना मिळेल असा विश्वास आमदार भोंगळे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये गजानन गोहणे, सुनीता गोहणे, संदीप गोहणे, महादेव गोहणे, सुमित्राबाई गोहणे, जगन गोहणे, उज्ज्वला गोहणे, अशोक गोहणे, आशा गोहणे, लक्ष्मण गोहणे, चंद्रकला गोहणे, शंकर सहारे, सुनंदा सहारे, विनोद सहारे,वीणा सहारे, श्रावण सहारे, मनीषा श्रावण सहारे, गंगाधर सहारे, प्रीतम राऊत, पंकज राऊत, बाबाराव नागोसे,.अतुल माथनकर ,शुभम मधुकर गावंडे, बाबाराव नागोसे, अतुल माथनकर, शुभम गावंडे,सुरेश इटकलवार, वंदना इटकलवार, श्रीधर गावंडे,गुणवंत गावंडे, वंदना गावंडे,मारोती आत्राम, दयाकर पवार, राधा पवार,ईश्वर उदार,गोपाल उदार,सुनील गावंडे, शशिकला इटकलवार,मनीषा इटकलवार,गीता सहारे,शीतल सहारे, रमेश सहारे संभाजी सहारे, सुरेखा सहारे, विजय सहारे,जयश्री सहारे, अजय संभाशिव सहारे,भारत पवार, माया पवार, अजय सहारे,भारत पवार नंदाबाई पवार, राहुल पवार, सुरज पवार,सुरज बोरकर ,रुपाली बोरकर,सुरेश बोरकर, मनोज बोरकर,चतुर बोरकर, दिनेश बोरकर,सुभाष राऊत, रमा राऊत, सुमित राऊत, सचिन महल्ले, प्रमोद महल्ले, विपिन ढोके,सुनील गावंडे, देविदास शेंडे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, अर्चना भोंगळे, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, माजी जिल्हा परिषद सभापती निता चौधरी, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, दिनेश खडसे, कार्तिक गोंलावार, जगदीश पिंपळशेंडे, दिनेश ढेंगळे, अमोल आसेकर, प्रमोद कोडापे, मनोज तुमराम, चंदुलाल इंगळे, यशवंत इंगळे, भास्कर राऊत, पंढरीनाथ इंगोले, रमेश राठोड, गोवर्धन वाघाडे, सुरेश कोंडावार, महादेव दूतकोर, मधुकर झुलकंटीवार,नागोराव शहारे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.