ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत उद्योग संरेखित नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शहीद नानक भील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती आणि शासकीय तांत्रिक विद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ बुधवारी दुपारी साडेतीन वाजता करण्यात आला. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पद्धतीने संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाॅवर ग्रिडचे डीजीएम प्रीतम बोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मूर्तिकार मिन्नत वाढई, आयएमसी सदस्य धनराज कोवे, प्रवीण गिलबिले, देवानंद पिंपळकर, लोकमान्य महाविद्यालय भद्रावतीचे प्राचार्य रूपचंद धारणे, तसेच प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावतीचे प्राचार्य प्रवीण बाळसराफ, हातझाडे, राऊत आणि कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहीद नानक भील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय भद्रावतीचे प्राचार्य आर. पी. श्रीरामे यांनी केले. कार्यक्रमाचे कुशल संचालन आर. के. उमाळे यांनी तर आभारप्रदर्शन वाय. व्ही. बोपले यांनी केले.

या नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या शुभारंभामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी अधिक प्रत्यक्ष जोड मिळणार असून, रोजगार संधींना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये