ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस बियाणे व साठेबाजी रोखण्यासाठी ‘साथी पोर्टल’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

फोटो कृषी निविदा विक्रेते यांचे रब्बी हंगामपूर्व प्रशिक्षण ; साथी पोर्टल फेज – २ प्रशिक्षण कोरपना बियाण्यांच्या उत्पादनपासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

बोगस बियाण्यांचे वितरण आणि विक्री रोखण्यासाठी तसेच बियाण्यांच्या उत्पादन आणि विक्री नोंदी पारदर्शक व्हाव्यात, या उद्देशाने ‘साथी पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले आहे.याचा प्रशिक्षण कार्यक्रम कोरपना येथे बुधवारी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष बुरेवार, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी कटरे,तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर जिल्हा गुण नियंत्रक बोडे , आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका गुणनियंत्रण निरीक्षक मिलिंद ढोणे, कृषी अधिकारी विनोद गाडगे यांनी सहकार्य केले.

यावेळी रब्बी हंगामपूर्व बियाणे विक्री, साठेबाजी तसेच वितरण याबाबत माहिती दिली. तसेच बियाण्याच्या जात तसेच विक्रीची अचूक प्रकारे नोंद ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले. रब्बी हंगामात सर्व प्रकारच्या बियाण्यांचे वितरण आणि विक्री केंद्र शासकीय विकसित केलेल्या ‘साथी पोर्टल’ प्रणालीद्वारे केली जाणार आहे. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते प्रतिक्रिया ‘बोगस बियाणे व साठेबाजी रोखण्यासाठी साथी पोर्टल प्रणालीचा प्रभावी वापर करावा.

यामुळे बोगस बियाणे विक्री, साठेबाजी तसेच बियाण्याच्या जादा दराने विक्री अशा प्रकारच्या घटना आळा बसणार.’ – मिलिंद ढोणे , तालुका गुणनियंत्रक अधिकारी कोरपणा साथी पोर्टलवर लॉगिन आयडी व पासवर्ड सर्व बियाणे उत्पादक व नोंदणीकृत विक्रेत्यांना देण्यात आले असून सर्वप्रथम वेळेवर पोर्टल वर लॉगिन करून प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोबाइल अप्लिकेशन वापर करून बियाणे विक्री करता येणार आहे.

साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्रीत कृषी विभागामार्फत पारदर्शकता निर्माण होणार आहे. बियाण्याचे वितरण, विक्री, उत्पादन यावर एकसंध नियंत्रण येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर बियाणे उपलब्ध होणार असून बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा बसणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये