मनसे च्या एक सही संतापाची या मोहिमेला गडचांदूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचांदूर शहर च्या वतीने “एक सही संतापाची” अभियान राबविण्यात आले.महाराष्ट्रात चालू असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचांदूर” च्या वतीने एक सही संतापाची” हे अभियान सोमवार दिनांक 13 जुलै रोजी घेण्यात आले. यावेळी शेतकरी बांधव,ज्येष्ठ नागरिक,तरुणांनी, शिक्षक, विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत चालू असलेल्या राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अभियानाच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे,शहर उपाध्यक्ष सिधेश्वर केंद्रे,ऋषिकेश भारती विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष,राजू चौधरी, गिरीश कामडी गजानन मुंडे, शिवगंगा ताई मटपती, संतोश कंठाळे, नितिन शाहा, अमीत अदोडे बालाजी पाटील, निनाद बोरकर नविन मलारफू, राकेश खेवले आदी पदाधिकारी उपस्थित होते