क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील कुख्यात गुंडावर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील कुख्यात गुंड नामे अंकुश गजानन तिरपुडे, वय २२ वर्ष, रा. हिंदनगर, गणेश मंदीर जवळ, ता. वर्धा याचेविरुध्द शरीराविरुध्द गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, अनधिकृत रीत्या घरात प्रवेश करुन मारहाण करणे तसेच महीलांचे विनयभंगाचे असे एकुण ११ गुन्हे पोलीस स्टेशन रामनगर, सांवगी (मेघे) चे अभिलेखावर नोंद आहेत. त्याच्या या गुन्हगारी कृत्यांमुळे पोलीस स्टेशन रामनगर अंतर्गत येणाऱ्या परिसराची शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने याचेविरुध्द ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन रामनगर श्री. महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना सादर केला होता. सदरहु प्रस्तावाचा मा. जिल्हा दंडाधिकारी, राहुल कर्डीले, यांनी गांर्भीयाने दखल घेवुन कुख्यात गुन्हेगार अंकुश गजानन तिरपुडे, वय २२ वर्ष, रा. हिंदनगर, गणेश मंदीर जवळ, ता. वर्धा याचा दिनांक १२.०७.२०२३ रोजी एक वर्षाकरीता स्थानबध्द आदेश जारी केला. त्यास नागपुर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे दिनांक १२.७.२०२३ स्थानबध्द करण्यात आले आहे. एम. पि.डी.ए. कायदयान्वये आज पावेतो एकुण ५ ईसमांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये अवैधदारु विक्रेते, शरीराविरुध्द गुन्हे करणारे गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार यांना कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेले आहे. तसेच भविष्यात सुध्दा वर्धा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा तसेच मा. पोलीस अधिक्षक, वर्धा यांचेकडुन अशा कठोर प्रतिबंधक कार्यवाही मुळे वर्धा जिल्हयातील अवैध दारु विक्री करणारे तसेच गुंड प्रवृत्तीच्या गुंडाचे धाबे दणानले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पो.स्टे. रामनगर, पोहवा/संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोलिस शिपाई सचिन दवाळे व अमोल गिते स्था.गु.शा. वर्धा तसेच पोलीस अंमलदार गजानन ईवनाथे, अरुण धोटे, ऋषीकेश धंगारे, चेतन पापले पो.स्टे. रामनगर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये