चनई (बु)येथे कोयापुनेम दसरा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील चनई बु. येथे आदिवासी बांधवांच्या वतीने कोयापुनेम दसरा परंपरिक वन, निसर्ग पूजा, शस्त्र, व विविध देव देवता, क्रांतिवीर शाहिदांचे पूजन करून उत्सहात साजरा करण्यातl आला. सदर पूजनाची सुरुवात परंपरिक ढोल,सनई वाद्याने करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा:-सौ. रेशमाताई अरुणजी मडावी सरपंच ग्रा.पं चनई या होत्या, तर उदघाटक म्हणून प्रमोदजी कोडापे युवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ते हे होते. विशेष अतिथी म्हणून अरुणजी मडावी जिल्हाध्यक्ष जमाती मोर्चा,मनोज तुमराम ता.अध्यक्ष जमाती मोर्चा, सरपंच नयनेश आत्राम, पारडीचे माजी सरपंच रामदासजी कुमरे, जमाती मोर्चा महामंत्री तिरुपती कन्नाके,मधुकरजी मडपती,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कुळसंगे मांडवा,विठ्ठल पाटील कुमरे गोविंदपूर, ग्रा. पं. सदस्य क्रिष्णा कुमरे,पो. पा. वामन खाडे, माजी सरपंच लक्ष्मीबाई आत्राम,जंगू पा. रायसिडाम, गावपाटील शामराव कुमरे, मुकुंदा मडावी, कवडू तोडसाम, मारोती कुमरे, बंडूजी पायघन,कवडू मडावी,मोनिका कुमरे, कल्पना जिवणे, स्वाती माणुसमारे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणजी मडावी आदिवासी नेते यांनी केले, व उदघाटणीय मार्गदर्शनातून प्रमोद कोडापे यांनी तालुका स्तरावरील 9 तारखेच्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चात व 13 तारीख जिल्हास्त्रावरील मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे आवाहन आदिवासी बांधवांना केले. तर संचालन क्रिष्णा कुमरे यांनी केले.यावेळी चनई(बु).येथिल महिला,पुरुष जास्त संख्येने उपस्थित होते.