ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे 7 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देऊळगाव राजा च्या वतीने विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव चे आयोजन 7 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अस्मिता लॉन, सातेफळ रोड , देऊळगाव राजा येथे करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री बालाजी संस्थान चे विश्वस्थ राजे विजय सिंह जाधव राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विचार मंच चे विदर्भ प्रांत टोळी गजानन वायचाळ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी साडेचार वाजता अस्मिता लॉन येथून पथसंचलन निघणार आहे, गावातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत अस्मिता लॉन येथे विसर्जित होईल, या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन नगर संघ चालक ॲड पुरुषोत्तम धन्नावत यांनी केले आहे.