ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“घुग्घुसमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शीतपेय व पाण्याचे वाटप”

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे २ ऑक्टोबर रोजी ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमीच्या निमित्ताने शीतपेय व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
शहरातून बौद्ध बांधवांच्या वतीने काढण्यात आलेली भव्य मिरवणूक आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राजवळ पोहोचली असता भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते शीतपेय व पाण्याचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे युवा नेते अमोल थेरे, मानस सिंग, सतीश बोन्डे, धनराज पारखी, हेमंत पाझारे, हेमंत कुमार, असगर खान, कोमल ठाकरे, संदीप तेलंग, उमेश दडमल, अजय लेंडे, हनुमान खडसे आदी उपस्थित होते.