नगर परिषद कार्यालयात गांधी-शास्त्री जयंती व धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर : घुग्घुस नगर परिषद कार्यालयात गुरुवारी (2 ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या श्रद्धा व उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेलाही हार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गांधीजींच्या सत्य-अहिंसा व शास्त्रीजींच्या साधेपणाच्या विचारांचे स्मरण केले तसेच आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता व न्यायाच्या संदेशाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता व लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करण्यात आला.