ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता लढवय्या : माजी आमदार सुभाष धोटे

नियोजन व आढावा बैठकीत प्रतिपादन ; शेकडो पक्षाचे पदाधिकारी उपस्थित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :– जिवती तालुका काँग्रेस कमिटी व जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन व आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत भविष्यातील रणनीती, जनसंपर्क व समाजसेवेत कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सांगितले की, “काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता लढवय्या आहे.

पक्षनिष्ठा व नित्य नवीन संकल्प घेत जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचे निराकरण करत राहणे आवश्यक आहे. जनतेची साथ कायम आपल्या सोबत असून खोट्या व भ्रामक प्रचाराचे सत्य जनसामान्यांच्या लक्षात आणून देत आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवा तसेच स्थानिक नागरिकांच्या व्यथांना वाचा फोडा असे आवाहन केले. तर उपस्थित काँग्रेसच्या वतीने जिवती तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित व्हावा, स्थानिक शेतकरी तथा जमीन मालकांना तहसील प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येत असल्याने ते चिंताग्रस्त आहेत हे कुठे तरी थांबले पाहिजे या व अशा अनेक समस्या घेऊन जिवती काँग्रेसच्या वतीने जन आंदोलन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

        बैठकीत जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, माजी अध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, नागनाथ तोगरे महाराज, सरपंच कोटनाके, तसेच युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांबळे, नंदाताई मुसने सुरेखाताई व जाधव ताई, देविदास कांबळे, बाळू पतंगे, विजय कांबळे, किशोर चांदोरे, संग्राम भोगे, निवृत्ती बटवाडे, तांबरे मामा, शिवाजी करेवाड, शंकर सोलंकर, ताजुद्दीन शेख, अजगर अली, जब्बार शेख, साहेबराव इंगळे, चंद्रमणी नरवाडे, बाबू मोहाळे, मुनीर शेख, पांचाळ मामा, दत्ता गायकवाड, केशव भालेराव, मोरे, कोंडीबा वाघमारे, परमेश्वर केसरे, मारुती कांबळे, अरुण भोगे, मारुती गायकवाड, विजय राठोड, रामभाऊ चव्हाण, बंडू राठोड, घुले मामा, प्रदीप काळे, डॉ. बनसोड यासह जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन उत्तम कराळे यांनी केले तर आभार देवीदास साबणे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये