तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
न्यायालयाचा आदेश असल्यानंतरही महसूल विभागाद्वारे शेतीचा फेरफार करण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून हवालदिल झालेले शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम वय 55 वर्ष राहणार मोरवा यांनी दिनांक 26 ला तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
वेळीच त्यांना चंद्रपूर येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती ठाणेदार योगेश पारधी यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना आयसीयू मधून साधारण वार्डात हलविण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात शेतीचा फेरफार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे दाखल केली होती.
मात्र महसूल विभागाकडून कित्येक महिन्यांपासून फेरफार करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने त्यांनी तहसील कार्यालयात विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले होते.