ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारुचा 2 लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 25/09/2025 रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा चे पथक पो. स्टे. हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की संत कबीर वार्ड हिंगणघाट येथे राहणारा सुजित गावंडे याने त्याचे घरी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या मालाचा साठा करून ठेवला आहे अश्या माहिती वरून सुजित गावंडे याचेवर दोन पंचासमक्ष प्रो. रेड केला असता.,

त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच घराच्या मागील भिंतीवरून उडी मारून पसार झाला शोध घेतला असता मिळून आला नाही. सुजित गावंडे याचे उघड्या घरातून रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारूने भरलेले 2 लीटरचे 84 बंफर किंमत 2,52,000/- रुपये चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष मोक्यावर जप्त करून आरोपी सुजित गावंडे, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट, ता . हिंगणघाट, जिल्हा – वर्धा (पसार) याचे विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहे.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये