कृषि विभागातील विविध योजनांबाबत मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील लांबोरी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान कडधान्य पिके कडधान्य कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून तंत्र सहायक सुमित घुले यांनी उपस्थित शेतक-यांना पिकांवरील किड व रोग व्यवस्थापनात निंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर,शत्रू-मित्र किड ओळख, फवारणी वरील खर्च कमी करणे तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजी, गरजेनुसार पिकांचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन, जैविक निविष्ठा वापर, बिजप्रक्रियेचे तसेच मृदा आरोग्य तपासणीचे महत्त्व, नैसर्गिक कुंपण – बांधावर बांबू लागवड व कृषि विभागातील विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सोबतच अंबुजा फाउंडेशनच्या वतीने समन्वयक आनंद कदम यांनीही शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन, चिकू फळबाग लागवड, बांबू लागवड इ. बाबींचे मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले.
लांबोरी गावचे सहायक कृषि अधिकारी संतोष जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.सदर कार्यक्रमास लांबोरी गावचे सरपंच मोतीराम सिडाम, प्रतिष्ठीत नागरिक चिनू पाटील कोडापे,तंटामुक्ती अध्यक्ष पुजू पाटिल कोडापे तसेच महीला व पुरुष शेतकरी बांधवांचे विशेष सहकार्य लाभले.