ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नान्होरी येथे अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाने केली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी:- महसूल विभागाने तालुक्यातील नान्होरी येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अवैध वाहतूक व उत्खनन करणाऱ्या वाहनांवर धाड टाकली. या कारवाईत जेसीबी, दोन ट्रॅक्टर, हायवा व यांत्रिक साधने जप्त करून वाहनमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याकरिता महसुल विभागाने फिरते व स्थायी पथक स्थापन केले आहे. या फिरत्या पथकामार्फत मंगळवारी, रात्री १२.३० वाजताच्या सुमारास नान्होरी येथे धाड टाकली असता रेतीची अवैधरीत्या साठवणूक करून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. महसूल पथकाने कारवाई करीत सर्वेश काळे (रा. नागभीड) याच्या मालकीचा एकजेसीबी, राकेश भेंडारे (रा. नान्होरी) व प्रवीण नथमल दोनाडकर (रा. दिघोरी) यांच्या मालकीचे प्रत्येकी एक असे दोन ट्रॅक्टर, सचिन वाघमारे (रा. नागपूर) याच्या मालकीचा हायवा आदी वाहने व यांत्रिक साधने जप्त केली.

या वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमनुसार कारवाई करण्यात येऊन वाहनमालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. यापुढे तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले ही कारवाई उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार सतीश मासाळ यांच्या नेतृत्त्वात पथकातील मंडळ अधिकारी नरेश बोधे, ग्राम महसूल अधिकारी हिमांशु पाजनकर, स्वप्निल ईसड आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये