ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टेबल टेनिस स्पर्धेत वणी क्षेत्राचा शानदार विजय

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर : नुकत्याच पार पडलेल्या आंतर-क्षेत्रीय टेबल टेनिस स्पर्धेत वणी क्षेत्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत क्षेत्राचा मान उंचावला. वणी संघाने आपला उत्कृष्ट खेळ सादर करत चॅम्पियनशिप किताब जिंकला.

या स्पर्धेत बृजेश सिंह, शैलेन्द्र वनकर, अजय पाटील आणि किरण झुंझीपल्लीवार यांनी विशेष योगदान दिले.

पुरुष एकल गटात बृजेश सिंह यांनी सुवर्णपदक पटकावत वणी क्षेत्राचा गौरव वाढवला.

युगल गटात बृजेश सिंह व राजदीप दुबे या जोडीने उपविजेतेपद मिळवले.

तसेच, शैलेन्द्र वनकर यांनी व्हेटरन्स ओपन सिंगल्सचे विजेतेपद पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांनी आपल्या सहकारी बबलू भाजोरिया यांच्यासोबत डबल्स गटात उपविजेतेपदही मिळवले.

संघाच्या या उल्लेखनीय यशात संघ व्यवस्थापक गुणवंत भाकरे, प्रशिक्षक संपत गरंटी, निलेश पिंपलकर आणि शुभम पिंपलकर यांचे मोलाचे योगदान राहिले.

वणी क्षेत्राच्या या शानदार विजयानं संपूर्ण क्षेत्राचा सन्मान व अभिमान वाढवला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये